बंद

    माननीय न्यायमुर्ती श्री. आर.जी. अवचट यांचे बद्दल माहिती

    प्रकाशित तारीख: एफ जे, वाय

    जन्म १५ मार्च १९६४ रोजी. पदवीपर्यंतचे शिक्षण म्हणजेच बी.कॉम. शिरूर (घोडनदी), पुणे येथे पूर्ण केले.

    १९८७ मध्ये आय.एल.एस. लॉ कॉलेज, पुणे येथून एल.एल.बी. (संपूर्ण प्रथम श्रेणी) केले. जून १९८७ मध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा येथे वकिली म्हणून प्रवेश घेतला. जिल्हा न्यायालय, पुणे आणि घोडनदी येथील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी न्यायालयात प्रॅक्टिस केली.

    मे १९९२ मध्ये दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ विभाग आणि न्यायदंडाधिकारी, प्रथम श्रेणी म्हणून न्यायव्यवस्थेत रुजू झाले. ऑक्टोबर २००३ मध्ये तदर्थ अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि नंतर जानेवारी २००८ मध्ये जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली.

    मे २०१५ ते जुलै २०१७ पर्यंत कोल्हापूरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केले आणि त्यानंतर मुंबई येथे उच्च न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी (दक्षता) म्हणून काम केले.

    ११ ऑक्टोबर २०१८ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती.